श्री. गोकुळ  गोटू अहिरे

मुख्याध्यापक

टिळक हायस्कूल, कराड

शाळेचा पत्ता:

 

 टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड

    फायनल प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड

    ता. कराड, जि. सातारा.

 

    Email- tilak1921@rediff.com   

 

Rounded Rectangle: व्हिजन
"तेजस्विनावधीतमस्तु "
Rounded Rectangle: मिशन 
“यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती, संस्कार, व संस्कृतियुक्त शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता, कौशल्ये आणि प्रेरणा विकसित होण्यासाठी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ओजस्वी करणे.”

टिळक हायस्कूल, कराड

     1920-2020

1920 - 2021

  100 Years  of  Quality Education

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक   विश्वस्त  व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images
Text Box: शाळेचा इतिहास –

     दि.१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले. स्वातंत्र्य युद्धातल एक पर्व संपलं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व भारतभर शोकसभांचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते. कराडमध्ये तर लोकमान्य टिळकांना देव मानणारे अनेक देशभक्त होते. त्यामुळे कराडवासियांनी दि.०२ ऑगस्ट १९२० रोजी आयोजित केलेल्या शोकसभेस सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र जमले. सभेमध्ये लोकमान्य टिळकांचे अल्पसे स्मारक म्हणून कराड येथे पूर्ण हायस्कूल व्हावे अशा आशयाचा ठराव सर्वानुमते संमत झाला. या सभेमध्ये टिळक स्मारक फंडासाठी ९–१० हजारांचे देणगीचे आकडे जाहीर झाले. दि.२ ऑगस्ट १९२० रोजी सभा ही या संस्थेच्या उज्ज्वल आयुष्याची नांदीच ठरली. या पार्श्वभूमीवर कराड नगरीत टिळकप्रेमी नागरिकांच्या सहकार्यातून शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलची स्थापना झाली.
    कराड नगरीला ‘विद्यानगरी‘ म्हणून नावलौकिक प्राप्त करून देण्यामध्ये ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये ‘शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेच्या ‘टिळक हायस्कूल, कराड’ या शाळेचे बहुमोल योगदान आहे. उच्च गुणवत्ता आणि देशप्रेमाचे बाळकडू पाजण्याचे अविरत कार्य करणाऱ्या या शाळेने राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सर्व क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटलेला आहे. 
    शैक्षणिक गुणवत्तेस पात्र ठरलेले टिळक हायस्कूल आता शताब्दीकडे वाटचाल करत आहे. स्थापनेपासून कराडमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी या शाळेकडे ओढा असतो. सध्या या शाळेमध्ये इ.५ वी ते १० वी अखेर सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वा नावलौकिक वाढविण्यामध्ये शाळेच्या आजी व माजी विद्यार्थ्याचा मोलाचा सहभाग आहे.

शाळेची वैशिष्ट्ये 

 

  * शाळेची स्वतंत्र इमारत.

  * एलसीडी प्रोजेक्टर व संगणकाच्या माध्यमातून शिक्षण.

  * सुसज्ज ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका.

  * विविध कार्यक्रमासाठी उच्चतम क्षमतेचे प्रेक्षागृह.

  * विज्ञान आणि गणिताची सुसज्ज प्रयोगशाळा.

  * विपुल क्रीडा साहित्य, पारंगत, अनुभवी क्रीडा शिक्षक.

  * गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील शाळा.

  * एन.एम.एम.एस., एम.टी.एस.शासकीय रेखाकला याच बरोबर अनेक स्पर्धा परीक्षामंध्ये घवघवीत यश सातत्याने मिळविणारी शाळा.

  * विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींतर्फे विद्यार्थ्याना मार्गदर्शन.

  * कराडमधील सामाजिक उपक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थी व अध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग.

  * कुशल व्यवस्थापन.

  * केंद्रशासन पुरस्कृत ‘अटल टिंकरींग लॅब‘ साठी अनुदान प्राप्त झालेली सातारा जिल्ह्यातील

     पहिली शाळा.

  * शाळासिद्धी – शासनाकडून शाळेचे ‘शाळा सिद्धी’ बाह्यमुल्यांकन करण्यात आले त्यामध्ये शाळेस ए+ ग्रेड प्राप्त झाली.

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo buttonImage result for letest news box

Announcements

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

कु.घोलप सर्वेश सर्जेराव- जिल्हात ११ वा

कु.देशमाने प्रथमेश महादेव- जिल्हात १३१ वा

कु.ढापरे वेदांत विवेक - जिल्हात १४२ वा

कु.पाटील ओम भिमगौडा - जिल्हात १४२ वा

शाळेच्या जुन्या आठवणी

     “समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणातून उत्कर्षाकडे नेण्यास कटिबद्ध”