Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

सौ. हेमलता राजेंद्र जंगम

मुख्याध्यापिका

स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
"कृतिशील शिक्षणाकडून स्त्रीशक्ती संवर्धनाकडे"

स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड

Image result for letest news box

Announcements

कु. संजीवनी रवी कांबळे, इ.९ वी - राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत - प्रथम क्रमांक

कु. समृद्धी पाटील- एन.टी.एस. परीक्षेत केंद्रीय पातळीवर निवड

युथ पार्लमेंट २०१७ च्या वक्तृत्व स्पर्धा इ. ८ वी ते १२ वी गटात ९ वी च्या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक व डी आय जी मा. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार

Rectangle: Rounded Corners: मिशन
“विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य व कलोपासनेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध”
Text Box: प्रशालेचा इतिहास

१९४० साली कराड नगरीत कन्याशाळा या नावाने रुजलेले छोटेसे रोप आज डौलदार वृक्षाच्या रुपात स्व.शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला नावाने उभे आहे. तिची सुरुवात, तिचा विकास आणि भरभराट खरोखरच उल्लेखनीय आहे. ज्या संस्थेला एक उच्चतर राष्ट्रीय प्रेरणा जन्मापासून मिळाली त्या शिक्षण मंडळ कराडचाच एक प्रवाह.
	सुरुवातीला केवळ ६१ विद्यार्थीनीना घेऊन श्री. सुपनेकरांच्या घरात भरणाऱ्या नंतर श्री.ढवळे यांच्या वाड्यात प्रवेश केलेल्या कन्या प्रशालेला १९४७ मध्ये मंगळवार पेठेतील मध्यवस्तीची जागा नगर पालिकेकडून मिळविण्यात आली. १९५३ मध्ये कन्या प्रशालेची इमारत पूर्ण करण्यात आली. पुन्हा इमारतीचा अपुरेपणा जाणवू लागला त्यामुळे १९७२-७३ मध्ये इमारतीचा विस्तार करण्यात आला.
	‘वाढता वाढता वाढे’ या न्यायाने आज शाळेमध्ये १५०३ विद्यार्थिनी ज्ञानार्जनाचा आनंद लुटत आहेत.
	प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. १९७१ मध्ये कु. प्रमोदिनी पटवर्धन ही एस.एस.सी. परीक्षेत बोर्डात २६ वी आली. बोर्डात झळकण्याचा पहिला मान तिने मिळविला. त्यानंतर पुणे बोर्ड वेगळे झाले आणि दरवर्षी कन्याशाळेच्या विद्यार्थिनी बोर्डात झळकू लागल्या. १९८८ साली कु. अपर्णा कुलकर्णी व कु. स्मिता देशपांडे यांनी पुणे बोर्डात प्रथम क्रमांकाने येऊन प्रशालेच्या कीर्तीचा ध्वज महाराष्ट्रात सर्वदूर फडकवला.
	त्यानंतर यशाचा आलेख अधिक अधिक चढू लागला. उत्तम राष्ट्रीय खेळाडू, पंतप्रधान ढाल विजेत्या गर्ल गाईडच्या विद्यार्थिनी कु. सीमा लाड सारख्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी तर राष्ट्रीय स्तरावर इन्सपायर अवार्डसाठी शिष्यवृत्ती पटकवणारी प्राची महाडिक अशा अनेक विद्यार्थिनी प्रशालेतील विविध शालेय आणि शाळाबाह्य उपक्रमातून तयार होऊ लागल्या आहेत.
	अभ्यास आणि क्रीडा या बरोबरच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची उज्ज्वल परंपरा प्रशालेत निर्माण झाली. किलबिलाट, कान्हा, बोलावा विठ्ठल, राजा शिव छत्रपती, गीत रामायण यासारखे नयनरम्य व कर्णमधुर, संगीत,  नाट्य नृत्यांवर आधारलेले कार्यक्रम प्रशालेचे खास आकर्षण ठरले आहेत.
	उत्कृष्ट चित्रकार, नामवंत लेखिका, उदयोन्मुख कवयित्री, राष्ट्रीय खेळाडू अशा अनेक कलावंत विद्यार्थिनी प्रशालेतील सुसंस्कारांनी घडल्या आहेत.
	अनेकविध शाळाबाह्य उपक्रम, सामाजिक जाणीव व संवेदना जागृती, अभ्यास पूरक व अभ्यासेतर उपक्रम हे प्रशालेचे वैशिष्ट्य आहे.
	उपक्रमशील मुख्याध्यापकांची परंपरा, उत्तरोत्तर कुशल व प्रगल्भ होत गेलेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपक्रमांना सार्थ जोड यामुळे प्रशालेतले उपक्रम कराड व पंचक्रोशीतील नागरिकाचे औत्सुक्याचे चे विषय ठरले आहेत. ठरत आहेत. या प्रशालेची गरुडझेप आता साता समुद्रापार गेली आहे. इंग्लंड, अमेरिका, आस्ट्रेलिया यासारख्या देशात प्रशालेच्या अनेक विद्यार्थिनी कार्यरत आहेत.
	‘शिक्षक हा अखंड विद्यार्थी असावा’ हा विचार येथील शिक्षकांमध्ये रुजला आहे. म्हणूनच सतत नवनवीन उपक्रम करून विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचे काम प्रशालेतील शिक्षक अखंड करत असतात. स्वतः ची व शाळेची शैक्षणिक प्रगती करताना विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन पारितोषिकेही ते मिळवतात. तज्ज्ञ मार्गदर्शक  म्हणून काम करतात, लेखन करतात.
	अशा या बहुरंगी प्रशालेने १९६५ साली थाटात रौप्य महोत्सव साजरा केला. आपल्या यशस्वी कारकिर्दीचा ठसा उमटवत. १९९० मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. हीच संधी साधून कराड शहरातील दानशूर लाहोटी कुटुंबीयांनी सात लाखांची देणगी उदार हस्ते देऊ केली. व शाळेचे स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर सन २००० मध्ये प्रशालेने आपला हिरक महोत्सव आणि सन २०१५ मध्ये आपला अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला आहे. आणि शताब्दी महोत्सवाकडे प्रशालेची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
	अशा प्रकारे प्रशालेतील विद्यार्थिनीचा सर्वांगीण विकास होऊन त्या सुसंस्कृत व्हाव्यात आणि भावी काळातील आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण व्हावे आणि भारतीय संस्कृती टिकवण्याची जबाबदारी त्यांनी पेलावी यासाठीच कन्या प्रशालेची वाटचाल अखंडपणे चालू आहे.

शाळेची वैशिष्ट्ये

 

> गुणवत्ता पूर्ण शिक्षण

> सुसज्ज संगणक विभाग

> समृद्ध क्रीडा विभाग

> समृद्ध संगीत विभाग

> समृद्ध चित्रकला विभाग

> पंतप्रधान ढाल पुरस्कृत गाईड विभाग

> मराठी वाङ्मय मंडळ

> विज्ञान छंद मंडळ

> इंग्लिश क्लब

> सामाजिक शास्त्रे मंडळ

> सहल विभाग

> दत्तक विद्यार्थिनी योजना

> पर्यावरण जागृती

> स्नेह संमेलन स्फूर्ती पुरस्कार

> विशेष दिन व दिन विशेष

> अग्रणी योजना

> भित्तिपत्रक झलक

> वाचन संस्कार

> शिक्षक प्रबोधिनी

शाळेचा पत्ता:

 

स्व. शेठ रामबिलास किसनलाल  लाहोटी कन्या प्रशाला, कराड

४८३. मंगळवार पेठ, कराड,

ता. कराड, जि.- सातारा

 

Email : kanyaprashala1940@gmail.com

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”