Text Box: शाळेचा इतिहास:	

	१ ऑगस्ट १९२० लो.टिळकांचे निधन झाले आणि महाराष्ट्र एका दूरदर्शी विचारवंताला मुकला. कराडमध्येही या घटनेचे पडसाद उमटले.लो.टिळकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २ ऑगस्टला कराडमध्ये झालेल्या शोकसभेत असा विचार पुढे आला की,लो.टिळकांसारख्या युगपुरुषाची ध्येयनिष्ठा,राष्ट्रप्रेम चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने एक शिक्षणसंस्था स्थापन करायची ज्यायोगे राष्ट्राला आकार देणारे आधारस्तंभ तयार होतील व लो.टिळकांचे देशसेवेचे व्रत चिरंतन सुरु राहील या विचारातून १ ऑगस्ट १९२० रोजी टिळक हायस्कूलची स्थापना झाली.त्यानंतर थोड्याच कालावधीत शिक्षण मंडळ कराड अस्तित्वात आले आणि कै.दादासाहेब आळतेकर यांच्यासारख्या कुशल नेत्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाचे कार्य सुरु झाले.
       कै.मा दादासाहेब आळतेकर व कै.विनायकराव फणसळकर यांच्या विचारातून संस्थेच्या प्राथमिक विभागाची अर्थात नूतन मराठी शाळेची १ जुलै १९३६ साली स्थापना झाली.४५ मुलांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या वर्गाचा शुभारंभ झाला.श्री शंकर गणेश आळतेकर हे शाळेच्या रजिस्टरवर नोंदलेले पहिले विद्यार्थी.
      त्यावेळी मुलींच्या शिक्षणाचा विचार फारसा प्रचलित नव्हता पण कै. दादासाहेब आळतेकरांनी आपली मुलगी कु इंदू हिचे नांव शाळेत नोंदवून शाळेच्या इतिहासात एक क्रांतिकारी बदल घडवला.यानंतरही शाळेने अनेक चांगले विद्यार्थी घडवून समाजाच्या प्रगतीला हातभार लावत आपल्या यशाची कमान चढती ठेवण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या शिक्षकांनी,मुख्याध्यापकांनी सुसंस्कार आणि ज्ञान या दोन तत्वांच्या आधारे शाळेच्या इमारतीचा पाया भक्कम करण्याचे काम केले.त्यामुळेच आजची सर्वांना भावणारी शाळा शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळेपण टिकवून आहे.
     १९३६ साली शाळेचा पट ४५ होता,पण आजचा शाळेचा पट हजाराच्या घरात आहे. दुसरी नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे शाळेची नुसतीच पटसंख्या वाढली नाही तर शाळेचा दर्जाही वाढला आहे.म्हणूनच गावातील एक नामांकित शाळा म्हणून शाळा ओळखली जाते.आज तर शाळेने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे.तसेच  देशपातळीवरही शाळा पोहचली आहे.
    पूर्वी शाळा सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ एका वाड्यात भरत होती.त्यानंतर थोडी वर्ष कन्याशाळेत नंतर टिळक हायस्कूलच्या सुरवातीच्या इमारतीत बरीच वर्ष शाळा भरत होती. या कालावधीत शाळेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली जुने शिक्षक त्यांचे समृध्द अनुभव यांचा उपयोग करून घेणारे नवीन शिक्षक शाळेत आले. त्यामुळे शाळेचे रूपच बदलले जुन्या नव्या ज्ञानाचा संगम आणि संस्कृती राष्ट्रप्रेम इ.संस्काराचे बाळकडू घेत शाळेत ज्ञान साधना होऊ लागली या साऱ्यांचे फलित म्हणजे १९५१ साली मा.नागेश स्वानंद धायगुडे या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती क्षेत्रात शाळेचा झेंडा फडकवला,त्यानंतर आज अखेर ४०० विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले यश नोंदवले आहे. १९९२-९३ साली तर १६ विद्यार्थी एकदम शिष्यवृत्ती परीक्षेच्या नामांकनात आले.तर २००३ साली कु.स्वरदा गिरीश देवधर या विद्यार्थिनीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीचा गड सर करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. विश्वजीत हणमंत मोरे याने जुलै २००९ मध्ये नेरूळ जिमखाना नवी मुंबई तर्फे नेपाळ येथील क्रिकेट स्पर्धेत सहभाग तसेच २००९ मध्ये वेस्ट इंडिज बरोबर लंडन येथे चषक मानकरी.
	तसेच कला क्रिडा क्षेत्रातही शाळा कुठेही मागे नाही. शाळेची विद्यार्थिनी कु.प्रज्ञा शशिकांत पाटील धावणेमध्ये व सुरज पाटील राज्य पातळीवर पुणे येथे प्रथम क्रमांक प्राप्त केला. क्षितीज सारंग बेलापुरे याने राष्ट्रीय पातळीवर जलतरण सुवर्ण व ब्राँझ पदक कु. शुभस्वा शिखरे हिने वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रपती पदक मिळवले २०१६-१७ या वर्षात तर  जागृती नितीन शिंदे हिची स्केटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड होऊन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली तसेच श्रीकृष्ण कदम याची आसाम गुवाहाटी येथे रोल बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
	शाळेत ६-१० या वयोगटातील मुले येतात त्यांना मनापासून शिकविणारे त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणारे शिक्षक पूर्वीपासूनच शाळेला मिळाले. आजही शाळेत येणारया शैक्षणिक बदलांना स्वीकारून स्वत: बरोबरच मुलांमध्येही बदल घडविणारे उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक मार्गदर्शन करणारे शाळेत आहेत.त्यांना सहकार्य करणारे आमचे शिक्षण मंडळातील पदाधिकारी वेगवेगळ्या शाखांचे शिक्षक आणि आमच्या विद्यार्थ्यांचे पालक या सर्व घटकांमुळे
 शाळेचा १९८६ – ८७ साली मोठ्या दिमाखात सुवर्ण महोत्सव व सन २०१०-११ साली अमृत महोत्सव साजरा केला.
      मुलांना शिक्षक, मुख्याध्यापक, क्लार्क व शिपाई यांच्याकडून प्रेम मिळते. त्यांना काय हवं नको याची चौकशी करतात.विद्यार्थीरुपी पिलांना आचार विचारांचे बळ पंखात देऊन गगन भरारी मारण्यासाठी सातत्त्याने या मोकळ्या जगात आई-वडील, गुरुजन, बहिण-भावंड, शेजारी यांच्यावर मनापासून प्रेम करणारी संस्काराची शिदोरी देणारी कर्तव्यनिष्ठ, चिकाटी, जिद्द, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन या शाळा माउलीचा आशीर्वाद घेऊन ही मुले या विचाराचा सुगंध घेऊन बाहेर पडतात. ही मुले निश्चितच पुढील आयुष्यात यशस्वी होतात.तेव्हा केलेल्या संस्काराचा हेतू साध्य होण्यासाठी ही नूतन मराठी शाळेची वाटचाल अखंड चालू राहील.
    ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगायचे म्हणजे :-
 आणि बालक बोबडा बोली | का वाकुडा विचुकी पाउली | 
 चोच करूनि माउली | रिझवी जेवी ||

शाळेची वैशिष्ट्ये:

 

* शाळेची स्वतःची स्वतंत्र, सुसज्ज अशी इमारत

* एलसीडी प्रोजेक्टर आणि संगणकाच्या माध्यमातून शिक्षण

* मनोरंजन

* ग्रंथालय

* गाणी,गोष्टींच्या सीडीज

* चित्रे, तक्ते, भारतीय बैठक व्यवस्थेने सुसज्ज वर्गखोल्या

* अॅक्वा वॉटर प्युरीफायरचे शुद्ध पाणी.

* कुशल व्यवस्थापन

* अग्निशमन यंत्रणा

* आकर्षक गणवेश

* प्रशिक्षित शिक्षक वर्ग

* विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी  सुसज्ज मैदान.

* डिजिटल वर्ग खोल्या.

सौ. उर्मिला राजेंद्र कांबळे

मुख्याध्यापिका

नूतन मराठी शाळा कराड

शाळेचा पत्ता:

 

 नूतन मराठी शाळा, कराड

   एस नं ३५, मंगळवार पेठ, कराड

  पिन – ४१५११०.

 

E –Mail  Id – nutankrad@gmail.com

Image result for letest news box

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

Announcements

जागृती नितीन शिंदे – स्केटिंग - लिम्का बुक वल्ड रेकॉर्ड

श्रीकृष्ण सचिन कदम - स्केटिंग - गिनीज बुक मध्ये नोंद

श्रीकृष्ण सचिन कदम – स्केटिंग - मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत (नवी दिल्ली) पुरस्कार

शिंदे जागृती नितीन – स्केटिंग - आसाम(गुवाहाटी )येथे रोल बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून प्रथम क्र., कोल्हापूर येथे प्रथम क्र

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
"अनुभवातून आनंद, आनंदातून शिक्षण"
Rectangle: Rounded Corners: मिशन 
“कोवळ्या वयात शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक व्यक्तिमत्व विकसित करण्याची  संकल्पना  साकारणारी शाळा”

नूतन मराठी  शाळा, कराड

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”