सौ. सुरेखा प्रदीप माने

अधीक्षिका

नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे वसतीगृह, कराड

पत्ता:

 

२२९, सोमवार पेठ, पाण्याच्या टाकीजवळ,

कराड. ता. कराड, जि. सातारा.

फोन : (०२१६४) २२६७७१

 

E-Mail:- workingwohostel@gmail.com

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
“स्त्रीशक्तीचे संवर्धन विश्वशक्तीचे दर्शन”
Rectangle: Rounded Corners: मिशन 
“ध्येयसिद्धीसाठी स्वगृहाबाहेर पडणाऱ्या स्त्रियांना सुरक्षित, कौटुंबिक वातावरणात आवश्यक सोयी - सुविधा पुरविणारे घर”

नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे वसतीगृह

Text Box: इतिहास –
	
	लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणार्थ कराडमध्ये २ ऑगस्ट १९२० साली शिक्षण मंडळ कराड, या संस्थेची स्थापना झाली. कराड शहराला विद्यानगरी म्हणून नावलौकिक प्राप्त करून देण्यामागे शिक्षण मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण मंडळ कराडने महिलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सन १९४२ साली मुलींसाठी कन्याशाळा सुरु केली. तसेच सन १९८६ साली कराड शहरात मुलींची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कनिष्ठ व वरिष्ठ महिला महाविद्यालयाची स्थापना केली. कराड शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, सर्व क्षेत्रातील सरकारी कार्यालये, वैद्यकिय संशोधन संस्था, विविध बँका, कार्यरत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना राहण्याचे सुरक्षित ठिकाण उपलब्ध नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून व काळाची गरज ओळखून शिक्षण मंडळ कराडने वर्किंग वूईमेंस होस्टेल काढण्याचे ठरवले. त्यासाठी शिक्षण मंडळ, कराडने  सन १९९३—९४ महिला व बालविकास विभाग दिल्ली यांचेकडे प्रस्ताव सादर केला. सर्व्हे  करणे, प्रस्ताव मांडणे, या बाबतची सर्व जबाबदारी संस्थेचे तत्कालीन सचिव डॉ.रा. गो. प्रभुणे यांनी महिला महाविद्यालय कराडचे प्राचार्य आल्बर्ट डिसोझा यांच्यावर सोपविली. त्यानुसार सोमवार पेठेतील जागेची निवड करण्यात आली. सन १९९३/९४  मध्ये वसतिगृहाची मुहूर्त मेढ रोवली. श्री. मंगेश फडणीस यांनी या इमारतीचा प्लॅन केला व संस्थेचे जुने कॉन्ट्रॅक्टर श्री. मंकरद महाजन यांनी शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून इमारतीचे बांधकाम केले. सन १९९९ मध्ये हि इमारत पूर्ण झाली व जून २००० पासून दोन विद्यार्थिनी व तीन महिला अशा पाच व्यक्ती सोबत वसतिगृहाची सुरुवात झाली. बघता बघता काही वर्षातच प्रभुणे सरांचा मार्गदर्शनाखाली व श्रीमती शेंडे यांच्या अधिकारात विद्यार्थिनी व महिला यांची संख्या ६० -७० पर्यंत वाढली. आज इथे ३५ /४० विद्यार्थिनी व महिला आहेत.
	संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या कुशीत वसलेल्या सोमवार पेठेतील मध्यवर्ती ठिकाणी शांत वातावरणात हि तीन मजली इमारत उभी आहे. वसतिगृहाच्या एका बाजूस थोड्याच अंतरावर दोन नद्यांचा सुंदर संगम आहे. शांत, सुंदर, प्रसन्न वातावरण व जवळच सर्व सुख-सोयी तसेच सर्व सुविधा उपलब्ध असलेले आपले वसतिगृह आहे.

वैशिष्ट्ये:-

 

* प्रत्येक रूममध्ये २ विद्यार्थीनीना राहण्याची सोय.

* रुममध्ये प्रत्येक महिलेस कॉंट, गादी, ऊशी, व टेबल, खुर्ची यांची सोय.

* दोन वेळची भोजनाची व चहाची व्यवस्था.

* वसतिगृहात टेलिव्हिजनची (केबलसहित) सोय

* वसतिगृहात गरम पाणि मिळणेसाठी सोलर सिस्टीम व्यवस्था.

* वृत्तपतत्राची सुविधा.

* वसतिगृहात सीसीटीव्ही व वॉटर प्युरीफाय सिस्टीम बसविलेली आहे.

* शांत व सुरक्षित वातवरण शिवाय वैद्यकिय सेवा जवळ व लगेच.

* सांस्कृतिक कार्यक्रम व वक्त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने.

* वसतिगृहात लॉकर सहित सुव्यवस्थीत कपाटांची सोय.

 

 

 

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”