Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

श्री. गोकुळ  गोटू अहिरे

प्राचार्य

टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड

शाळेचा पत्ता:

 

 टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड

    फायनल प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड

    ता. कराड, जि. सातारा.

 

    Email- tilak1921@rediff.com   

 

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
"तेजस्विनावधीतमस्तु "
Rectangle: Rounded Corners: मिशन 
“यशस्वी जीवनासाठी विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती, संस्कार, व संस्कृतियुक्त शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता, कौशल्ये आणि प्रेरणा विकसित होण्यासाठी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ओजस्वी करणे.”

टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड

Text Box: कॉलेजचा इतिहास :-

	लोकमान्य टिळकांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याच्या उद्देशाने कराड मधील दूरदृष्टी व्यक्तींनी एकत्र येऊन लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच ‘शिक्षण मंडळ, कराड ‘या संस्थेची स्थापना केली . सन १९८६ मध्ये कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालाची सुरवात करण्यात आली. स्त्री-शिक्षण, ग्रामीण भागातील मुलींना मॅट्रिकेत्तर शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने व काळाची पाऊले ओळखून या महाविद्यालयाची उभारणी झाली.
	कै. ग. स. तथा दादासाहेब अळतेकर यांच्या शुभहस्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. १२ जुलै १९८६ पासून महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखांचे वर्ग सुरू करण्यात आले. शासनाने पाहिल्याच वर्षी महाविद्यालयास मान्यता व अनुदान प्रदान केले. 
	सुरुवातीच्या काळात महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र शिक्षण घेत होते. कला शाखा ६२ व वाणिज्य शाखा ३८ विद्यार्थी एवढ्या अल्प संख्येवर सुरू झालेल्या आमच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज एक हजारहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सन १९९४ पासून या महाविद्यालयात विज्ञान शाखाही सुरू करण्यात आली आहे. 
	इ. १२ वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता यादीत व विषय गुणवत्ता यादीत येण्याची विद्यार्थिंनींची परंपरा गुणवत्ता यादी बंद होईपर्यंत अविरत चालू होती. उच्चतम निकालाची परंपराही अखंडपणे सुरू आहे. क्रीडा क्षेत्रातील उज्जवल यश ही महाविद्यालयाची ओळख म्हणता येईल. व्यावहारिक, जीवनोपयोगी व अध्यावत ज्ञान देण्याचे कार्य महाविद्यालयातील उच्चविद्याविभूषित शिक्षक करत असतात. कर्तव्यदक्ष व प्रेमळ शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयाचा ठेवा आहे. 
	विविध स्पर्धा, उपक्रम, दिन यातून विद्यार्थिंनिंचा सर्वांगीण विकास सध्या करण्यास महाविद्यालय कटिबद्धा आहे. गरीब व गरजू विद्यार्थिनींना मोफत बस पास शैक्षणिक साहित्य, गणवेश तसेच आर्थिक सहाय्य महाविद्यालयामार्फत दिले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्राहक भांडारा मार्फत सवलतीत व माफक दरात शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते.
	महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून कै. डॉ. रा. गो. प्रभूणे यांनी आपला ठसा उमटविला. महिला महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य अ. रे. डिसूझा यांच्या कल्पक नेतृत्वातून महाविद्यालयाची जडणघडण झाली. त्यानंतर झालेल्या सर्वच प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. 
	महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारोह मोठ्या दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त मा. नीला सत्यनारायण (आय.ए.एस.) या समारोहास प्रमुख अतिथि व मा. व्ही. बी. पायमल (शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग कोल्हापूर) हे अध्यक्ष म्हणून लाभले. आज महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. जी. अहीरे व उपप्राचार्य श्री. अ. श. आटकर महाविद्यालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

कॉलेजची वैशिष्ट्ये:- 

* कला ,वाणिज्य, विज्ञान शाखांच्या शिक्षणासाठी कराडमधील नामांकित महाविद्यालय.

* विविध विषयात एच. एस. सी. बोर्डात अव्वल क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थिंनींची अखंड परंपरा.

* महाविद्यालयाची स्वतंत्र, प्रशस्त, इमारत व क्रीडांगण, सी. सी. टी. व्ही., सुरक्षारक्षक आणि दक्ष कर्मचार्‍यांमुळे अत्यंत सुरक्षित वातावरण.

* राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, मौलाना आझाद गुणवत्ता शिष्यवृत्ती व भारत सरकार मागासवर्गिय शिष्यवृत्ती उपलब्ध.

* एस. टी. महामंडळ सवलत पास काढण्याची महाविद्यालयातच सोय.

* विद्यार्थिनी ग्राहक भांडाराच्या माध्यमातून सवलतीमध्ये शैक्षणिक वस्तूंची विक्री.

* स्कॉलर बॅच व बॉर्डर बॅच तसेच तज्ज्ञ अद्यापकांचे विषयावर विशेष मार्गदर्शन.

* विविध विषय दिन, रांगोळी, मेहंदी, फूड फेस्टिवल, हस्तलिखिते, भित्तीपत्रके, वाचन, निबंधस्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजन .

* ग्रंथालय व अभ्यासिकेची उपलब्धता, अत्याधुनिक साधनांनी जाणीवपूर्वक तयार केलेली प्रयोगशाळा.

* विद्यार्थिनींमध्ये कला व क्रीडानैपुण्य, नेतृत्वक्षमता, व्यक्तिमत्त्व विकसित करण्यात प्राधान्य.

* तज्ज्ञ, उच्चशिक्षित व अनुभवी अध्यापक.

* आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणार्‍या नामांकित माजी विद्यार्थिनी.

* गरीब व गरजू विद्यार्थिनींना गणवेश, वहया व मोफत पास, तसेच एन. जी. भोसले ट्रस्ट तर्फे आर्थिक मदत.

* डिजिटल क्लासरूम व सर्व साधनांनी सुसज्ज ऑडीटोरियम.

Image result for letest news box

Announcements

कु. स्वरदा मंगेश विदार- इंडियन इंस्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे इन्स्पायर कॅम्पसाठी ४५०० विद्यार्थ्यांमधून निवड

कु. वाघ सृष्टी दयानंद - जलतरण राज्यस्तर तृतीय क्रमांक

कु. पाटील पल्लवी चंद्रकांत कुरश - राज्यस्तरावर उपविजेता प्रथम क्रमांक

कु. इनामदार मुस्कान अमजद - ट्रॅडिशनल कुस्ती (मास) राज्यस्तर कास्यपदक तृतीय क्रमांक

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”