शिक्षण मंडळ, कराड

            

             शिक्षण मंडळ, कराड ही संस्था ऑगस्ट २०२० मध्ये शंभर वर्षे पूर्ण करत आहे. या शंभर वर्षात संस्थेच्या विविध शाळांमधून हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यापैकी शेकडो विद्यार्थी आज मोठे उद्योजक - व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. आजही संस्थेच्या विविध शाखांमधून दरवर्षी शेकडो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असतात. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करावयाचा असतो. तर बऱ्याच जणांना चांगली नोकरी हवी असते. परंतु, यासाठी त्यांना हवे असणारे मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आपल्या परिसरात उपलब्ध नाही.

             हीच गोष्ट लक्षात घेवून शिक्षण मंडळ, कराड आपल्या शताब्दी वर्षात State of Art असे Skill Development Centre सुरु करत आहे. पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण येथे उपलब्ध आहे. Aptitude Test, Technical Knowledge, Soft Skill Development, Interview Techniques पासून अगदी Professional पद्धतीने Resume तयार करण्यापर्यंतचे प्रशिक्षण येथे देण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान, सरकारी योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे इत्यादी गोष्टींचेही मार्गदर्शन येथे केले जाते.

             कराड शहर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हजारो छोटे - मोठे उद्योगधंदे आहेत. IT Companies, MNCs आहेत. या सर्वांनाच कुशल मनुष्यबळाची कायमच आवश्यकता असते. परंतु, कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवाराकडे या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य असतेच असे नाही. त्यामुळे, या दोघांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे शिक्षण मंडळ, कराडचे Skill Development Centre.

             शिक्षण मंडळ, कराडच्या शाखांमधून पदवी घेवून बाहेर पडणारा विद्यार्थी असो किंवा इतर कोणत्याही संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी असो, सर्वांनाच योग्य नोकरी मिळावी यासाठ शिक्षण मंडळ, कराड Placement Cell सुरु करत आहे. संपुर्णत: ऑनलाइन अशी ही सेवा आहे. विद्यार्थ्यांनी उद्योजकांनी दोघांनीही www.shikshanmandalkarad.com/placement या वेबसाईटवर जावून आपले प्रोफाईल प्रथम नोंदणी करावे. या Placement Cell चे कामकाज कसे असेल ते आपले प्रोफाईल नोंदणी करतांना आपल्याला समजेलच. विद्यार्थ्यांना योग्य नोकरी उद्योजकांना योग्य मनुष्यबळ मिळावे हीच यामागची संकल्पना. ही सेवा विद्यार्थी उद्योजक दोघांसाठीही पूर्णपणे मोफत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हाच या मागील उद्देश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ शिक्षण मंडळ, कराडच्या शाखांमधून बाहेर पडलेले विद्यार्थीच नव्हे तर सर्वच विद्यार्थी जे नोकरीच्या शोधात आहेत ते आपले प्रोफाईल येथे नोंदणी करू शकतात.

             धन्यवाद !

 

                                                                                                                     Team Skill Development & Placement

                                                                                                                           Shikshan Mandal, Karad

Placement Cell

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच