|| संस्कृतिका || |
शिक्षण मंडळ, कराड |
सर्वं हि तपसा साध्यम् | मनु. |
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था |
Shikshan Mandal, Karad |
mandalshikshan@gmail.com |
Ph.91-2164-223407, 226029 |
संस्कृतिका व महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने अमरकोश पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील मिळून दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. २०० विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने अमरकोश पाठ केला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या भाषा समिती तज्ञ मार्गदर्शिका सौ. तरंगिणी खोत मॅडम व प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका अक्षया जोशी व सौ. सुचेता भागवत यांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला. यावेळी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य जगदीश इंदलकर हे देखील उपस्थित होते. |
२१ डिसेंबर २०२० रोजी मा. प्रदीप कुरुलकर, डायरेक्टर, डीआरडीओ मुंबई, मा. डॉक्टर माधव केळकर, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ प्रमुख व संस्कार भारतीचे कार्यकर्ते, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संस्कृत शिक्षक यांच्या उपस्थितीत संस्कृतिकेचे उद्घाटन करण्यात आले. याचा पुढचा कार्यक्रम लाहोटी कन्या शाळेमध्ये संस्थेच्या सर्व शिक्षकांच्या साक्षीने घेण्यात आला |
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सदस्या तरंगिणी खोत मॅडम व जगदीश इंदलकर यांनी संस्कृत शिक्षकांना मार्गदर्शन केले व संस्कृतिकेला सदिच्छा भेट दिली. |
संस्कृतिकेच्या वाढीसाठी आणि संस्कृतिकेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी संस्कार भारती कराड या शाखेचे सदस्य व संस्कृत प्रेमी श्री. प्रदीप इनामदार यांनी संस्कृतिकेसाठी २१ हजाराची देणगी दिली. |
“विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच” |