बालविद्यालय, ओगलेवाडी

सौ. आशादेवी अनिल भुतकर

मुख्याध्यापिका

बालविद्यालय, ओगलेवाडी

Image result for letest news box

Announcements

ओंकार सुहास वझे- कला अंतरंग पुणे मंडळ-कलादर्शन अमन मन्सूर आली पटेल-कला अंतरंग पुणे मंडळ-कलादर्शन

गौरी काशीद-कला अंतरंग पुणे मंडळ-कलादर्शन

रिया संतोष बनसोडे-कला अंतरंग पुणे मंडळ-कलादर्पण

यश दीपक रंगाटे-कला अंतरंग पुणे मंडळ-कलादर्पण

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
“विविध प्रश्न विचारु द्या, ज्ञान माझे वाढू द्या”
Rectangle: Rounded Corners: मिशन 
“मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी,  चिमुकल्यांच्या विविध प्रश्नांना प्रतिसाद देऊन  ज्ञानात भर घालणारी शाळा”
Text Box: शाळेचा इतिहास-

	ऐतिहासिक, भौगोलिक आणि औद्योगिक वारसा मिळालेल्या, सदाशिव गडाच्या पायथ्याशी वसलेल्या ओगलेवाडीच्या परिसरात दि. १० जून १९२७ रोजी शिक्षण मंडळ, कराडच्या बालविद्यालय या प्राथमिक शाळेची स्थापना झाली. भविष्याचा वेध घेत ’शिकाल तर टिकाल’ हे ब्रीद जोपासत बालविद्यालय, ओगलेवाडी परिसरातील बालकांना शालेय शिक्षणात पारंगत करतानाच त्यांच्यामध्ये वर्तन कौशल्ये, स्वच्छता, आरोग्य, शिस्त, स्वाभिमान, स्वावलंबन, सहकार्य यांचीही जोपासना करते. विविध उपक्रम, स्पर्धा, क्रीडा, सण-समारंभाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू करण्यासाठी  बालविद्यालायाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर मदतनीस सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची पारख करत व अध्ययनातील त्यांच्या अडचणी समजावून घेत प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अश्या विविध पद्धतींनी पहिलीपासून चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शाळेची टुमदार इमारत, संस्कारक्षम गोष्टींचे आरेखन रंगीत चित्रांनी करून जाणीवपूर्वक सजविलेल्या बोलक्या भिंती, प्रशस्त मैदान, झाडे, फुलझाडे, वेलींनी अधिकच आकर्षक केलेला परिसर, घसरगुंड्या, झोपाळे, सी-सॉ अशी खेळाची विविध साधने, शिकविताना संगणकाचा उपयोग व डिजिटल वर्गखोल्या, बालग्रंथालय व इतर सोयी सुविधांनी सुसज्ज बालविद्यालय, ओगलेवाडी नजीकच्या परिसरात एक नामांकित शाळा म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. पदवीधर, अनुभवी व कुशल शिक्षकांनी शाळेला अधिक स्पर्धात्मक बनविले आहे.
	‘लेझीम, हलगी, तुतारीने भारावलेल्या वातावरणात संस्था वर्धापन दिनापासून, राष्ट्रीय व सामाजिक सणांपर्यंत प्रत्येक विशेष दिन उत्साहात साजरा करणारे बालविद्यालय. वैज्ञानिक प्रयोग, अंकांशी मैत्री, भाषाविकास, कार्यानुभव, अभिनय, गायन, पाठांतर, चित्रकला अशा अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास करणारी एकमेव प्राथमिक शाळा म्हणून ओगलेवाडीत अग्रगण्य आहे.

शाळेची वैशिष्ट्ये-

 

* शाळेची स्वतःची स्वतंत्र इमारत आहे

* एलसीडी प्रोजेक्टर आणि संगणकाच्या माध्यमातून शिक्षण

* बाल ग्रंथालय, विज्ञान, निसर्ग, गाणी, गोष्टींच्या सीडींचा संग्रह

* विज्ञान आणि गणिताची प्रयोगशाळा

* अभ्यासक्रमाचे तासिकांवर आधारित नियोजन

* विपुल शैक्षणिक साहित्य

* चित्रे, तक्ते, भारतीय बैठक व्यवस्थेने सुसज्ज वर्गखोल्या

* अॅक्वा वॉटर प्युरीफायरचे शुद्ध पाणी

* विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वछतागृहे

* अग्निशमन यंत्रणा

* आपत्कालीन प्रसंगासाठी फस्टॆएड बॉक्स

* आकर्षक गणवेश

* पोषक खाऊ

* कुशल व्यवस्थापन

शाळेचा पत्ता:

 

 बाल विद्यालय, ओगलेवाडी

सर्वे नं. १७, हजारमाची पोस्ट – ओगलेवाडी

ता. कराड जि. सातारा

 

E-mail:- balvidyalayaogalewadi@gmail.com

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”