शाळेचा इतिहास 

 

      किल्ले सदाशिवगड व गडाभोवती ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजमाची, बाबरमाची, वनवासमाची, हजारमाची आणि देशातल्या पहिल्या काच कारखान्याने जगाच्या औद्योगिक  नकाशावर स्थान मिळविलेल्या ओगलेवाडीमध्ये सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मा. आत्मारामपंत ओगल्यांनी काच कारखान्याच्या कामगार  व कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण मिळावे म्हणून ओगलेवाडीत पहिली माध्यमिक शाळा स्थापन केली. १९५० मध्ये बालविद्यालायाची सर्व व्यवस्था ’शिक्षण मंडळ, कराड’ या संस्थेकडे करण्यात आली. जून १९६१ मध्ये बालविद्यालायाचे ’आत्माराम विद्यामंदिर’ असे नामकरण करण्यात आले.

        मराठी माध्यमाच्या आत्माराम विद्यामंदिरमध्ये आज केवळ ओगलेवाडीच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावे व कराडमधील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थांना शारीरिक शिक्षण, कला व क्रीडा प्रशिक्षण देऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थी संस्कारक्षम होण्यासाठी शाळेत राष्ट्रीय व सामाजिक महत्वाच्या सण – समारंभांचे आयोजन केले जाते.

      शाळेतील सर्व अध्यापक वर्ग उच्चविद्याविभूषित, अनुभवी व निपुण आहे. शाळेचे ग्रंथालय प्रयोगशाळा सुसज्ज असून उत्कृष्ट शैक्षणिक साधनांचा उपयोग करून विद्यार्थांना अद्यावत पद्धतींनी प्रशिक्षण देण्यात येते.

      शाळेला नामांकित माजी विद्यार्थांची परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात शाळेचे माजी विद्यार्थी काम करत आहेत. दरवर्षी प्रेरणादायी काम करणाऱ्या माजी विद्यार्थांना शाळेतर्फे ‘ प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.

             शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग लक्षणीय आहे. सन - २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत शाळेला विज्ञान प्रयोगशाळा समृद्धीकरणासाठी AIM  - अटल इनोव्हेशन  मिशन या योगनेअंतर्गत ATL अटल टिंकरिंग  लॅब मंजूर झाली.

Image result for letest news box

Announcements

कु. शिवं सुर्यकांत जाधव, १० वी ब, याने नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मैदानी स्पर्धेत हातोडाफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.

जयराज बाबुराव माने - राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग

सिद्धेश महेश कुंभार – इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत A ग्रेड

केदार सुभाष माने – राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील खो-खो स्पर्धेत सहभाग

विशाल पंढरी मोहीते - राज्यस्तरीय कुमारगट कब्बडी स्पर्धेत सहभाग

शिवम सुर्यकांत जाधव – विभागस्तरीय हातोडा फेक क्रीडा स्पर्धेत तृतीय

स्टाफ अचिव्हमेंटस

श्री. संतोष बजरंग कुंभार - संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

श्री. उद्धव बापूराव जाधवर - सातारा शिक्षक परिषद उपाध्यक्ष म्हणून निवड

श्री. भरत गणपती टिपुगडे - संस्था पातळीवर शिस्त पालन समितीवर निवड

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

सौ. प्रतिभा अशोक तारू

मुख्याध्यापिका

आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी

शाळेची वैशिष्ट्ये

> शाळेची स्वतंत्र प्रशस्त इमारत व क्रीडांगण.

> इ. ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी माध्यम सुविधा.

> अनुभवी व तज्ज्ञ अध्यापक वर्ग.

> सुसज्ज प्रयोगशाळा.

> समृद्ध ग्रंथालय व सर्व विद्यार्थांना शालेय पुस्तकांची उपलब्धता.

> एलसीडी प्रोजेक्टर व संगणकच्या माध्यमातून शिक्षण.

> शाळांत परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा व गुणवत्ता यादीत स्थान.

> राष्ट्रीय पातळीवर क्रीडा नैपुण्य मिळवण्याची परंपरा.

> माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळवण्याची परंपरा.

> M.T.S. N.T.S N.M.M.S. व बाह्य परीक्षा मार्गदर्शन.

> विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासेत्तर उपक्रम.

> खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शन.

> इयत्ता ५ वी साठी सन २०१६ पासून गुरुकुल सुविधा उपलब्ध.

> मार्च २००६ पासून शालेय एस.एस.सी. परीक्षा केंद्र.

> अध्यापनात ई - लर्निग सुविधा.

> इयत्ता १० वी साठी स्कॉलर बॅच व बोर्डर बॅचची सोय.

> संगणक, चित्र, नाट्य, कला क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासास वाव.

> गरीब गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याची मदत.

> गुणवान विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकाची संधी.

> नामवंत माजी विद्यार्थ्यांचा ‘प्रेरणा पुरस्कार’ ने सन्मान देणारी शाळा.

शाळेचा पत्ता:

 

आत्माराम विद्यामंदिर,

ओगलेवाडी – ४१५१०५.

 

Email us -  smkavmo@gmail.com

Rectangle: Rounded Corners: व्हिजन
“न हि ‌ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते”
Rectangle: Rounded Corners: मिशन 
“ज्ञानार्जनातून सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण देणारी शाळा“

आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”