नाव:- डॉ. शैलजा रमेश पाटील

                                       (प्राध्यापिका, महिला महाविद्यालय, कराड)

           

 

 

‘विद्वान सर्वत्र पूज्यते ’या उक्ती प्रमाणे महिला महाविद्यालय, कराड येथे कार्यरत                       डॉ.शैलजा रमेश पाटील केवळ प्राध्यापकच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन समाजसेवक,पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या पर्यावरणप्रेमी,स्वतःतील जागृत विचारांची पुस्तक रूपाने मांडणी करणाऱ्या सृजनशील लेखिका, स्थानिक स्तरा पासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित सत्कारमूर्ती , राज तथा राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार – प्रसार करणाऱ्या प्रचारक,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करणाऱ्या कलाप्रेमी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बेटी बचाव-बेटी पढाओ, मतदार  जनजागृती, एड्स रॅली, रस्ता सुरक्षा अभियान, घनकचरा निर्मूलन, वृक्षारोपण, पोलीसमित्र, महिला दक्षता समिती सदस्य, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती सदस्य या उपक्रमांच्या माध्यमातून पथनाट्य लेखन व प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कार्यपटू आहेत. त्यांचे कार्य उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे .

       घरच्या शैक्षणिक संस्कारातून त्यांनी बी.ए., एम्.ए.(प्रथम श्रेणी), एम्.फिल् (ए ग्रेड) ,पीएच्. डी. , पर्यंत शिक्षण पूर्ण केले.त्या सध्या शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक व मार्गदर्शक म्हणून कार्य पाहतात. कराड तालुक्यातील कुसूर सारख्या छोट्या खेड्यात जन्म झाला.तिथे ११वी पर्यंत शिक्षण घेतले  व कराड येथे स.गा.म.कॉलेज एम्.ए. हिंदी  पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिक्षण मंडळ,कराड येथे हिंदीच्या प्राध्यापक पदावर रुजू झाल्या.कार्यरत असताना एम्.फिल् ,पीएच्.डी.पूर्ण केले. संशोधन पर लेख लिहिले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय सेमिनार व चर्चासत्रात सहभाग घेतला आहे. पाटण, वडूज, शिराळा, इस्लामपूर, रेठरे, मलकापूर, उंब्रज, नागठाणे, सातारा, कोरेगाव, शिरूर, अलाहाबाद, गोवा, इंदोर, पुणे, अयोध्या, स.गा.म.,बापुजी साळुंखे कराड या कॉलेज मध्ये व्याख्याने दिली आहेत. आपले काम उत्तम व उत्कृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.वयाच्या ५९व्या वर्षी संगणक साक्षर बनून वैश्विकरण प्रक्रिये नुसार आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी इंटरनेटचा वापर करून आयसीटीच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र काम करतात .कराड ही त्यांची कर्मभूमी आहे .जिथे आपल्या कार्याची पताका यशस्वीपणे फडकवली आहे .त्यांच्या बाबतीत एवढचं म्हणावसं वाटत –

“ मंजिले उन्हींको मिलती हैं,जिनके सपनों में जान होती है          

Designed & developed by : Shikshan Mandal Karad’s, Institute of Information Technology, Karad.

Stay connected with us

Image result for facebook logoImage result for logo emailImage result for g+ logo button

शिक्षकांचे सुयश

शिक्षण मंडळ, कराड

सर्वं हि तपसा  साध्यम् | मनु.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

Shikshan Mandal, Karad

mandalshikshan@gmail.com

Ph.91-2164-223407, 226029

Image result for email logo images hdImage result for phone logo red images

     “विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणास प्रथम प्राधान्य, अंतिम ध्येयही विद्यार्थ्यांचे दर्जेदार शिक्षणच”